डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत 26 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे

सहाय्यक आयुक्तांचे आवाहन यवतमाळ, दि. 20 (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नवीन किंवा नुतनीकरण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता 26 मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह 26 मार्चपर्यंत संबंधित कार्यालयात हार्डकॉपी सादर करावी. अर्ज सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित