Posts

Showing posts from June, 2026

कर्जमुक्तीची प्रक्रिया होणार ऑनलाईन Ø >‘आधार प्रमाणिकरण’ अनिवार्य

Image
यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून 'महाआयटी'च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबविली जात आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले व ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केलेलल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार न...

शेतकरी व ग्रामीण उद्योजकांसाठी २ जुलैला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम

Image
ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लीड जिल्हा बँक कक्ष (सेंट्रल बँक ऑफ इंडिया), यवतमाळ यांच्या वतीने विशेष राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे तसेच ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. दि. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता राधा मंगल हॉल, यवतमाळ येथे पार पडणार आहे. पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशातील असंघटित व वंचित घटक, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लघु उद्योजक यांच्यापर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली संचय योजनेचा लाभ पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय निर्माण करून नागरिकांना भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेही या उपक्रमाचे ध्येय आहे. या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबाबत व्यापक जनजागृत...

चिचबर्डी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा

Image
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देवून ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला. दरम्यान यवतमाळ तालुक्यातील चिचबर्डी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांच्या उपस्थितीत ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभ पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका संगीता चनेकर, लिपीक विजय राठोड यांच्यासह शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.

‘स्कुल चले हम’…..! जिल्ह्यात ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नवागत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या ‘शाळा प्रवेशोत्सव’ समारंभनिमित्त जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळमधील गोधणी रोड येथील जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक विद्यालय येथे भेट देवून विद्यार्थ्यांना फुलपुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले. या शाळेतील 1975 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून बारावीच्या कॉमर्स सायन्स तसेच उर्दू मधील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख तसेच दहावीच्या उर्दू मराठी विभागातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांसाठीच्या योजना, सुविधा, जिल्हा प्रशासनाच्या उपक्र...

लेख : कर्जमुक्ती योजना : शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीकडे पाऊल

शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' ही केवळ कर्जमुक्तीची योजना नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा आणि आत्मविश्वास वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणारी आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्यापक आवाका. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या स्वतःच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे केवळ एका विशिष्ट बँकेपुरती मर्यादित न राहता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना समान लाभ मिळणार आहे. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अनेक कर्जमाफी योजनांमध्ये काही बँका किंवा वित्तीय सं...

विशेष वृत्त : राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी, प्रादेशिक व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' सुरू केली असून, ही योजना शेतकऱ्यांनी विविध बँका व सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जांस लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध बँकिंग व सहकारी संस्थांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ मिळण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असून, शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण...

भूमिहीन आदिवासींसाठी स्वाभिमानाची नवी दिशा !

 आदिवासी कुटुंबांना २ ते ४ एकर जमीन मिळणार  पूर्णतः अनुदानित झालेल्या सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भुमिहीन आणि दारिद्रय रेषेखालील आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्टया सबळ करण्यासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानाला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत भुमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींच सबळीकरण व स्थाभिमान योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना ४ एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा २ एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे भुमिहीन आदिवासींना स्वाभिमानाची नवी दिशा मिळणार आहे. भूमिहीन दारिद्रय रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांच्या खरेदी- विक्री व्यवहार आणि प्रचलित रेडीरेकनर दर विचारात घेऊन जमीन खरेदीसाठी पूर्वी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिले जात होते. मात्र, ही योजना आता पुर्णतः अनुदानित करण्यात आली आहे. जमीन खरेदी आणि लाभार्थी निवडीसाठी प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर आय...

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारतींचे प्रस्ताव आमंत्रित

वणी येथील २५० विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वणी शहरात सर्व सोयी-सुविधांनी युक्त खासगी इमारत भाडेतत्त्वावर देवू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे. वसतिगृहासाठी आवश्यक असलेल्या इमारतीमध्ये २५० विद्यार्थ्यांच्या निवासक्षमतेनुसार किमान ५० खोल्या असाव्यात. तसेच इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ सुमारे १० हजार चौरस फूट, २० शौचालये, २० स्नानगृहे तसेच वीज, पाणी व इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. वणी शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारची इमारत भाड्याने देण्यास इच्छुक असलेल्या इमारत मालकांनी किंवा संस्थांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह इमारत भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव दि. ३ जुलैपर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांच्या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुसद कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये ३० जूनला शाळा प्रवेशोत्सव

आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसदच्या कार्यक्षेत्रातील ८ शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सवी वातावरणात करण्यात येणार असून विविध शैक्षणिक, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशोत्सवानिमित्त नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असून प्रभातफेरीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, शालेय बॅग, पेन, पेन्सिल, इतर शैक्षणिक साहित्य तसेच नवीन शालेय गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उन्हाळी शिबिर, बोलका वर्ग, जेईई/नीट प्रवेशपूर्व परीक्षा प्रशिक्षण, महाराष्ट्र दर्शन यांसारख्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शासकीय आश्रमशाळा वडगाव (शिंदे) आणि पुसद येथे इयत्ता ११ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, यावर्षी विद्यार्थी पटसंख्येत मागील व...

आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’

 विद्यार्थ्यांचे होणार स्वागत  विद्यार्थी, पालकांनी सहभागी व्हावे- सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांचे आवाहन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत कार्यरत १८ शासकीय व २८ अनुदानित आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त मंगळवार, दि. ३० जून रोजी शाळेचा पहिला दिवस 'शाळा प्रवेशोत्सव दिन' म्हणून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवानिमित्त आश्रमशाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असून प्रभातफेरी, शाळा परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण, स्वागत फलक, बॅनर आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना सूचना दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ चैतन्यमय व उत्साहवर्धक वातावरणात होऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीस गती मिळावी, या उद्देशाने आदिवासी विकास विभागांतर्गत...

शाळा प्रवेशोत्सवासाठी ७८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

विद्यार्थ्यांच्या स्वागतासह शाळांची गुणवत्ता व सुविधांची करणार तपासणी राज्य शासनाच्या 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना भेट देण्यासाठी वर्ग-१ व वर्ग-२ मधील ७८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी ३० जून २०२६ रोजी नियोजित शाळांमध्ये उपस्थित राहून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करतील तसेच शाळांतील विविध सुविधांची पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबत आदेश जारी केले असून, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणे, शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नियुक्त अधिकारी शाळांमधील भौतिक सुविधा, खेळाची साधने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पुस्तक व्यवस्था, शालेय पोषण आहार, स्वच्छतेच्या सवयी आदी बाबींची तपासणी करणार आहेत. तसेच धोकादायक इमारती, वापराअभावी किंवा पाण्याअभावी बंद असलेली स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत समस्या आढळल्य...

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 चे जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन आज उपकेंद्र लासिना, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड येथे उत्साहात संपन्न झाले. मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. तसेच प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवून पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी केले. याप्रसंगी माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर, सरपंच श्रीमती ज्योती दुधे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगल पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. स्मिता पेटकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती दुधे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका चंचला मुंदाणे, सुचिता ठाकरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कैलास जवंजाळ, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ...

आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

 ६ जुलैला पहिली गुणवत्ता यादी; १ जुलैपासून स्वयंम अर्ज नूतनीकरणाची संधी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला असून, शाळा, विद्यालये व महाविद्यालये सुरु झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सर्व अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांना दिले आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या स्तरांनुसार अर्ज करण्याची व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्री-मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रवेश अर्ज १६ जून २०२६ पासून सुरू झाले असून, त्यांची गुणवत्ता यादी ६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. याव्यतिरिक्त, ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेश अर्ज १ जुलै २०२६ पासून सुरू होणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. तर १ जुलैपासून स्वयंम योजनेच्या अर्जाचे नूतनीकरण क...

जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची संधी

Image
- पालक सचिव धीरज कुमार > जिल्ह्याचा घेतला सविस्तर आढावा जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम करण्याची प्रचंड संधी आहे. या संधीचा फायदा घेवून जिल्ह्यात लोकोपयोगी नाविण्यपूर्ण काम करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालक सचिव धीरज कुमार पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन व इतर विभागांचे काम चांगले सुरु आहे. जिल्ह्यात काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी टीम म्हणून काम करावे. लोककेंद्रीत प्रशासन राबवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश पाल...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांना कळले त्यांना महाराष्ट्र नक्की कळेल

Image
-पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन  राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन  जिल्हा परिषदेत सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांना कळले त्यांना महाराष्ट्र नक्की कळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित सामाजिक न्याय दिन समारंभ आणि नशामुक्त सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, युवराज मेहेत्रे, जालिंदर आभाळे, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मुन, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, माजी जिप सदस्य यशवंत पवार, श्रीधर मोहोड, हरिहर लिंगमवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करुन पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने प्रजेचे राजे होते. त्यांन...

यवतमाळमधील कृष्णकुंज नगरात सावकारी पथकाची धाड ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी पथकाने कृष्णकुंज नगर, आमराई, वडगाव रोड, यवतमाळ येथील वाय. पी. परळीकर यांच्या निवासस्थानी झडती कारवाई केली. या कारवाईदरम्यान ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले. अशोक उत्तमराव दिघाडे यांनी २२ जून रोजी परळीकर हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने २५ जून रोजी झडती घेतली. कारवाईदरम्यान घरातून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय समन्वय समिती दिली. कारवाईसाठी सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक रिता बाळकृष्ण निनावे यांच्या नियोजनानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पथकात व्ही. के. हिरूळकर सहाय्यक निबंधक, दारव्हा, एस. डब्ल्यू. खरतडे,रोशन गाडे, विद्या भोवते, के. एस. मारसट्टीवार,अनिल मामीडवार...

कर्जमुक्ती योजनेतून मंत्री, खासदार, आमदार, सरकारी अधिकारी कर्मचारी बाद

>पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून याबा योजनेचा शासन निर्णय 2 जून रोजी जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत काही विशिष्ट घटकांना लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान अथवा माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागरी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान किंवा माजी लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. केंद्र किंवा राज्य शासनातील मासिक 25 हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्थांमधील 25 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन असलेले अधिकारी व कर्मचारी यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतीव्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, तसेच मासिक 25 हजार रुपयांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, माजी सैनिकांना या अटीतून सूट देण्यात आली असून त...

शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ‘कर्जमुक्ती योजना’

लेख : दि. 25 जून 2026 राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध व्हावे आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी आणि दूरदृष्टी असलेल्या शासक म्हणून ओळखल्या जातात. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे. राज्य शासनाने यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्...

ढाणकी येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय

Ø कार्यकक्षेत ढाणकी, निगणुर, दराटी व बिटरगाव मंडळांचा समावेश प्रस्तावित Ø हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची मुदत यवतमाळ, दि. २५ (जिमाका) : उमरखेड तालुक्याअंतर्गत ढाणकी येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यकक्षेत ढाणकी, निंगपूर, दराटी आणि बिटरगाव या महसूल मंडळांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. तहसिल कार्यालय उमरखेड अंतर्गत कार्यरत मंडळांतील नागरिकांना कार्यकक्षेबाबत काही सूचना व हरकती असल्यास जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड येथे दस्तावेजासह लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रस्ताव शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात येणार आहे. 000000

28 जूनला टीईटी परीक्षा!

यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 28 जून रोजी दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशानुसार परीक्षेच्या सुरळीत व पारदर्शक आयोजनासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून परीक्षार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत होणार आहे. पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यात 19 परीक्षा केंद्रांची तर दुसऱ्या पेपरसाठी 28 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक परीक्षा कक्षात लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सर्व परीक्षार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी व फ्रिस्किंग तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी पहिल्या पेपरसाठी सकाळी 8.30 वाजता आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 12.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. पहिल्या पेपरसाठी सकाळी 10.10 नंतर आणि दुसऱ्या पेपरसाठी दुपारी 2.10 नंतर कोणालाही परीक्...

पुसदला आता नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय!

Ø शासनाची मिळाली मान्यता; कार्यक्षेत्रात दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांचा समावेश Ø सूचना व हरकती नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता दिली आहे. या कार्यालयाचे मुख्यालय पुसद येथे प्रस्तावित करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यासंदर्भात सार्वजनिक हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासकीय सोय आणि लोकहिताच्या दृष्टीने पुसद येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, कार्यक्षेत्र निश्चित करताना तालुका हा मूलभूत घटक मानण्यात आला असून क...

पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला २ जुलैपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला २ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क व इतर आवश्यक माहिती संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागेल. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरता येणार असून त्यांच्या शंका व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी तस...