महापुरुषांचे स्मारक, पुतळे व सभागृहांसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागणार

 मंत्री डॉ.अशोक उईके यांनी घेतला सविस्तर आढावा  तातडीने कार्यवाहीचे निर्देश राळेगाव विधानसभा मतदारसंघातील व यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारके, पुतळे तसेच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकासमंत्री ना. डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीना, नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राळेगाव विधानसभा व यवतमाळ परिसरातील विविध महापुरुषांची स्मारके, पुतळे तसेच सभागृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री डॉ.अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीमुळे राळेगाव व यवतमाळमधील महापुरुषांचे स्मारक, पुतळे व सभागृहांसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती