युवा भारततर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी विविध उपक्रमांचे आयोजन

मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, यवतमाळ, स्वा. सावरकर स्मारक समिती, स्वा. सावरकर विचार मंच आणि साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साई इंग्लिश लर्नर अॅकॅडमी, राणा प्रताप नगर, वडगाव येथे भाषण स्पर्धेने झाली. अमित ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत यवतमाळमधील अभियांत्रिकी शिक्षण घेणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्पर्धकांनी मराठी व इंग्रजी भाषेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेत निवेदिता इंगोले हिने प्रथम क्रमांक, रुपेश झाले यांनी द्वितीय क्रमांक तर केतकी इंगोले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी युवकांना ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमाची माहिती दिली. युवकांमधील कला, कौशल्य व नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून सर्व युवकांनी अशा कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दत्त चौक येथे स्वा. सावरकर विचार मंचाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हनुमान आखाडा चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्त्या डॉ. ललिता घोडे यांनी सावरकर यांच्या जीवनपटाचा सखोल आढावा घेत त्यांच्या देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. तरुण वयात अनेक हालअपेष्टा सहन करून देशासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी नगरसेविका मनीषा भावे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा भावे होत्या. मंचावर मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे, प्रमुख मार्गदर्शिका डॉ. ललिता घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राम साकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवकुमार जोशी अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, लक्ष्मणराव खत्री हिंदू महासभा, परिमल देशपांडे संचालक, यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक, रोशन यादव, मुन्ना अटकुलवार आणि राम भुतेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
मेरा युवा भारत यवतमाळ कार्यालयाचे अनिल ढेंगे, जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे आणि राम साकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती