आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’

 विद्यार्थ्यांचे होणार स्वागत  विद्यार्थी, पालकांनी सहभागी व्हावे- सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांचे आवाहन प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत कार्यरत १८ शासकीय व २८ अनुदानित आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त मंगळवार, दि. ३० जून रोजी शाळेचा पहिला दिवस 'शाळा प्रवेशोत्सव दिन' म्हणून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवानिमित्त आश्रमशाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असून प्रभातफेरी, शाळा परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण, स्वागत फलक, बॅनर आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना सूचना दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ चैतन्यमय व उत्साहवर्धक वातावरणात होऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीस गती मिळावी, या उद्देशाने आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेशोत्सवात पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती तसेच सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती