नेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, नेर येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्य, निर्वाह भत्ता तसेच ई-ग्रंथालय यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८५ टक्के जागा राखीव असून त्यामध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १ टक्का व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hams.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची छायाप्रत, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी वसतिगृहाचे गृहपाल दीपक घावडे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३७२३८०२ किंवा ९४२३१३१०६६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती