नशामुक्त भारत अभियानांतर्गत सामाजिक सप्ताहात सहभागी व्हावे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे आवाहन

 १७ ते २६ जूनदरम्यान आयोजन  आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन  शाळा, महाविद्यालय, वसतिगृहांनी प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, लघुपट, पोस्टर व स्लोगन स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शासकीय व अनुदानित वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या मोहीम कालावधीत ‘नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये नशामुक्ती विषयक प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य लेखन, निबंध स्पर्धा, लघुचित्रफित निर्मिती व प्रसारण यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नशामुक्त भारत अभियान प्रश्नमंजूषामध्ये सहभागी होण्यासाठी या उपक्रमांतर्गत तसेच निबंध, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेसाठी https://forms.gle/4T6xKEPkWX1t3GmU7%oA%oA या लिंकचा वापर करता येणार आहे. नशामुक्तीविषयक चित्रपट व लघुपट पाहण्यासाठी https://tinyurl.com/zizktret ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअॅप, एसएमएस, ई-मेल व सोशल मीडियाच्या माध्यमातून नशाविरोधी संदेशांचा प्रसार करण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सायकल रॅली, बाईक रॅली, जनजागृती फेरी, व्यसनमुक्ती विषयक मानवी साखळी तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी भेटी देऊन जनजागृती करण्याचे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. अभियानांतर्गत नागरिकांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून नशामुक्तीची शपथ घ्यावी. ऑनलाइन शपथ घेण्यासाठी https://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून शपथपत्राचा नमुनाही तेथे उपलब्ध आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांनी राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नशामुक्त भारताच्या निर्मितीस हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती