२५ जून रोजी पेन्शन अदालत व कार्यशाळा
मा. महालेखाकार, नागपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी २५ जून रोजी सकाळी ११ ते १.३० वाजेपर्यंत तसेच राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे निवृत्तीवेतन विषयक पेन्शन अदालत व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी उपस्थित राहून आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
कार्यशाळेत ई-निवृत्तीवेतन भुगतान आदेश, ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली, प्रकरणांच्या स्थितीचा थेट मागोवा आणि निवृत्तीवेतनधारक समाधान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment