जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १२ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. यू. बघेले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सी. एल. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-२ व्ही. जी. रघुवंशी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ पी. एस. इंगळे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक एच. दाभाडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हा न्यायालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित