यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी सात मतदान केंद्र

महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड येथील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांमध्ये यवतमाळ, आर्णी व बाभुळगाव येथील मतदारांना यवतमाळ तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान करावे लागणार आहे. वणी व मारेगाव येथील मतदारांना वणी तहसील कार्यालय, पांढरकवडा, झरी-जामणी व घाटंजी येथील मतदारांना केळापूर तहसील कार्यालय, राळेगाव व कळंब येथील मतदारांना राळेगाव तहसील कार्यालय, दारव्हा व नेर येथील मतदारांना दारव्हा तहसील कार्यालय, पुसद व दिग्रस येथील मतदारांना पुसद तहसील कार्यालय, उमरखेड, महागाव व ढाणकी येथील मतदारांना उमरखेड तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रांत मतदान करावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. येत्या 12 जून रोजी निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती