मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातर्फे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबीर
जिल्हा महिला व बाल रुग्णालय यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल अॅड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे मोफत गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 17 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे होणार आहे.
यवतमाळ व परिसरातील गुडघेदुखी, सांधेदुखी, चालताना त्रास, जिने चढताना अडचण तसेच गुडघ्यात सूज अशा समस्यांनी त्रस्त नागरिकांसाठी हे शिबिर लाभदायी ठरणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येणार आहे.
वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत असलेल्या व आवश्यक उत्पन्नाचा दाखला सादर करणाऱ्या पात्र रुग्णांची गुडघा व खुब्याच्या सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांवर मुंबई येथील संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबिरामध्ये तज्झ ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी, मोफत एक्स-रे सुविधा, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच औषधांवे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी येताना संबंधित वैद्यकीय कामदपत्रे, जुने एक्स-रे आणि उत्पन्नाचा दाखला सोबत आणावा, असे आवाहन करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. प्रसाद वनसोड (९४२२१६९२८४), अनिल पिसे (९१६८५८५५८६), विनोद मोरे (७६६६९७९३८१), सुमित पारधे (८३९००२३३९३) व आवेश खान (२५०३६,३१३२०) यांच्याशी संपर्क साधावा.
या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदन कक्ष तसेच ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे
Comments
Post a Comment