आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अमृत-आयजीटीआरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दहावी उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये संगणक नियंत्रित त्रसंचालन तंत्रज्ञान, संगणक सहाय्यित रचना व उत्पादन आराखडा, सॉलिड वर्क्स डिझाईन, कॅटिया डिझाईन, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर प्रोग्रामिंग, यंत्रमानव व स्वयंचलन तंत्रज्ञान तसेच यांत्रिक-विद्युत एकात्मिक तंत्रज्ञान (मेकॅट्रॉनिक्स) या विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थींना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी हे या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० जून असून प्रवेश परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत २२ जून रोजी घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा प्रारंभ २४ जून पासून होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी mahaamrut.org.in येथे भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल करिअरची वाटचाल सुरू करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक परिक्षीत शर्मा यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), स्वामी समर्थ विहार, पहिला मजला, फ्लॅट क्रमांक ए-१, यवतमाळ येथे संपर्क साधावा. तसेच मोबाईल क्रमांक ९११२२२७६३३ वरही संपर्क साधता येईल.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती