क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभाग व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांच्या अंतर्गत संचालित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, जुने पोलीस कवायत मैदानाजवळील सामाजिक न्याय भवन परिसर, येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. वसतिगृहात विद्यार्थीनींना मोफत निवारा, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ३ टक्के, अनाथ विद्यार्थिनींसाठी २ टक्के तसेच दिव्यांग विद्यार्थिनींसाठी ३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थीनींनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच रहिवासी दाखला ही कागदपत्रे अनिवार्य आहेत.अधिक माहितीसाठी वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती एस. वाय. महल्ले यांच्याशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित