श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष

 दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘युडीआयडी’ कार्ड आधार संलग्न करावे  तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग नोंदणी कक्ष सुरु करण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे लाभ नियमित व सुरळीतपणे सुरू राहावेत, यासाठी यवतमाळ तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी), दिव्याग प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे जुन्या स्वरूपाचे, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा विशेष अपंगत्व मूल्यांकन मंडळाचे प्रमाणपत्र आहे, त्यांनी दिव्यांग नोंदणी कक्ष येथे जावून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढून घ्यावे. तसेच काही लाभार्थ्यांच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि आधार कार्डवरील नाव अथवा जन्मतारखेमध्ये तफावत असलेल्या लाभार्थ्यांनी तसेच ज्या लाभार्थ्यांचे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न झालेले नाही, त्यांनीही दिव्यांग नोंदणी कक्षात जाऊन तफावत दूर करुन आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित