महिलांच्या उद्योगवाढीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा - राजलक्ष्मी शाह

 वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनारचे आयोजन  गतवर्षी २,२२३ स्वयं सहाय्यता गटांना १०० कोटींचे कर्ज महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यवतमाळ यांच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनार २०२६-२७ चे आयोजन महिला व बाल विकास भवन, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल इंगळे, विभागीय सल्लागार केशव पवार, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख तसेच माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे यांच्या हस्ते झाले. सेमिनारमध्ये राज्यस्तरीय नवतेजस्विनी प्रकल्पाचे सादरीकरण केशव पवार यांनी केले, तर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा जिल्हास्तरीय क्रेडिट प्लॅन सुनील सोसे यांनी सादर केला. यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २,२२३ स्वयं-सहाय्यता गटांना १००.४७ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. सन २०२६-२७ साठी २,३९५ स्वयं-सहाय्यता गटांचे कर्जलिंकेज, एक हजार सूक्ष्म उद्यम कर्ज प्रकरणे तसेच ११८.९३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई यांच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह या दूरस्थ पद्धतीने सहभागी झाल्या. स्वयं-सहाय्यता महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या उद्योगवाढीस चालना देण्यासाठी सर्व बँकांनी समन्वयाने कार्य करून अधिकाधिक कर्जपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. महिला बचत गटांना कर्जपुरवठा व आर्थिक समावेशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बँका व बँक अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ज्ञानेश्वर टापरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मनोज सावंत, आयसीआयसीआय बँकेचे सचिन निर्मळ, एचडीएफसी बँकेचे पंकज निखाले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नुपूर तिवलकर तसेच भारतीय स्टेट बँकेचे योगेश निलखन यांचा समावेश होता. कार्यक्रमास ज्ञानेश्वर टापरे, अतुल इंगळे, केशव पवार, पवन देशमुख, माविम मुंबईचे प्रशिक्षण तज्ज्ञ सल्लागार सुमोध हळकर तसेच सुनील सोसे उपस्थित होते. याशिवाय विविध बँकांचे अधिकारी, सीएमआरसी व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार आणि प्रकल्प प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी पुनवटकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती