सिंधी विस्थापितांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी विशेष अभय योजना
18 व 19 जूनला यवतमाळ, वणी येथे विशेष कॅम्प
: जिल्ह्यातील यवतमाळ व वणी तालुक्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल व फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना 2025 अंतर्गत उपविभागीय अधिकारी, यवतमाळ व वणी यांच्या स्तरावर 18 व 19 जून रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
महसूल विभागामार्फत आयोजित या कॅम्पमध्ये सिंधी विस्थापितांना त्यांच्या निवासी व व्यावसायिक जमिनींच्या शर्तभंग नियमितीकरण व फ्री-होल्ड प्रक्रियेसंदर्भातील अर्ज अथवा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. तसेच कॅम्पदरम्यान प्राप्त होणाऱ्या अर्जांवर शासनाकडून विशेष अभय योजनेस मुदतवाढ मिळाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
यवतमाळ व वणी तालुक्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांनी या संधीचा लाभ घेऊन संबंधित कॅम्पमध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अथवा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
Comments
Post a Comment