विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे नामांकन दाखल
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी यवतमाळ मतदारसंघातून पाच उमेदवारांनी एकूण दहा नामांकन अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी आतापर्यंत ५५ अर्जांची उचल करण्यात आली आहे. ही
नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये साहेबराव दत्तराव कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दुष्यंत सतीश चतुर्वेदी (शिवसेना), नितीन सुरेशचंद्र भुतडा (भारतीय जनता पक्ष), सय्यद फारुक सय्यद करीम (अपक्ष) आणि साजिद बेग हाफिज बेग मिर्झा (अपक्ष) यांचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत १ जून रोजी संपुष्टात आली असून, अर्जांची छाननी २ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.



Comments
Post a Comment