पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 चे जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात संपन्न

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन आज उपकेंद्र लासिना, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड येथे उत्साहात संपन्न झाले. मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. तसेच प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवून पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी केले. याप्रसंगी माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर, सरपंच श्रीमती ज्योती दुधे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगल पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. स्मिता पेटकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रिती दुधे, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका चंचला मुंदाणे, सुचिता ठाकरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कैलास जवंजाळ, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कोपरकर, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सुनीता लाकडे, तालुका आरोग्य सहाय्यक अनंत सावळे, आरोग्य सहाय्यक अजय जोगदंड, गौरव सोनोने, सचिन तोडे, आरोग्य सेविका श्रीमती दोडेवार तसेच आशा स्वयंसेविका, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित पालकांना नियमित लसीकरणा बरोबरच राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे दरम्यान प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांपर्यंत लसीकरणाची सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील अपेक्षित लाभार्थी संख्या 229832 असून, आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत एकूण 207391 लाभार्थ्यांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. ही संख्या एकूण अपेक्षित लाभार्थ्यांच्या 90.24% इतकी आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 2714 लसीकरण बूथ, 165 ट्रान्झिट टीम आणि 113 मोबाईल टीम कार्यरत करण्यात आल्या होत्या. तसेच मोहिमेच्या प्रभावी पर्यवेक्षणासाठी 577 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. या मोहिमेत उर्वरित राहिलेल्या बालकांना ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस आशा स्वयंसेविका व कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी गृहभेटीद्वारे पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी सक्रिय सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती