आर्णी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता ७५ विद्यार्थ्यांची असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, आर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित