यवतमाळ येथील शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश मिळणार

>प्रक्रिया सुरू सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, आकाशवाणी जवळ, यवतमाळ येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येत आहेत. सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास, भोजनाची व्यवस्था, ग्रंथालय, संगणक लॅब, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, खेळाचे साहित्य तसेच निर्वाह भत्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ८५ टक्के जागा राखीव असून त्यामध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १ टक्का व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी ५ टक्के तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के जागा राखीव आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक असून त्यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. प्रवेशासाठी मागील शैक्षणिक सत्रातील गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. तर कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी वसतिगृहाचे गृहपाल आर. जी. रत्ने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मो. क्र. ९९२२३८८९७७, ९८९०५९३९१५, ९४२३१३१०६६ व ९३०७४६४०४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती