राळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, राळेगाव येथे 2026-27 च्या शैक्षणिक सत्रासाठी रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था, ग्रंथालय, संगणक कक्ष, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, निर्वाह भत्ता तसेच विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 85 टक्के जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी 5 टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी 5 टक्के आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रवर्गांमध्ये 5 टक्के समांतर आरक्षण लागू राहील. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत असून इयत्ता 11 वी 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9130218209 किंवा 0720-2299233 वर संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती