Posts

Showing posts from September, 2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा ; 50 हजारांपर्यंत पारितोषिक

  Ø   गणेश मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन  Ø   7 सप्टेंबरपर्यंत   अंतिम मुदत  Ø   तालुकास्तरावर 25 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक               यवतमाळ, दि. 1 (जिमाका) :   राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीनही स्तरांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.             या स्पर्धेसाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या   ganeshotsav.pldmka.co.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबरपर्यंत आहे. नोंदणीकृत व परव...

शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे ५१० उमेदवारांची निवड

  > शिक्षण विभागाला यादी प्राप्त                          > बुधवारपासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पवित्र पोर्टलद्वारे शासनाने शिफारस केलेल्या शिक्षक पदभरतीतील एकूण ५१० उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणित स्वरूपात नोंदविलेल्या माहितीची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.   ही कागदपत्र पडताळणी वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे आवाह...