शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे ५१० उमेदवारांची निवड

 

> शिक्षण विभागाला यादी प्राप्त

                         > बुधवारपासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी

यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पवित्र पोर्टलद्वारे शासनाने शिफारस केलेल्या शिक्षक पदभरतीतील एकूण ५१० उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणित स्वरूपात नोंदविलेल्या माहितीची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.

 

ही कागदपत्र पडताळणी वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कागदपत्र पडताळणीच्या कालावधीत संबंधित उमेदवार अनुपस्थित राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीची नोंद राज्य स्तरावर कळविण्यात येणार असून अनुपस्थितीबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यवतमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

बॉक्स

निवड यादीतील अनुक्रमांकानुसार वेळापत्रक दिनांक : २ सप्टेंबर २०२६ वेळ : स. १० ते सायं. ६ वा. अनुक्रमांक : १ ते २०० दिनांक : ३ सप्टेंबर २०२६ वेळ : स. १० ते सायं. ६ वा. अनुक्रमांक : २०१ ते ४०० दिनांक : ४ सप्टेंबर २०२६ वेळ : स. १० ते सायं. ६ वा. अनुक्रमांक : ४०१ ते ५१०

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित