गणेश मंडळांच्या माध्यमातून योजनांविषयी मार्गदर्शन व आरोग्य तपासणी

 





‘लोकसंवाद’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
: गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालय आणि मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत यवतमाळ येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी गणेश मंडळाच्या सभागृहात शासकीय योजनांची जनजागृती कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिर काल घेण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालय, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, आयुष्मान भारत योजना आणि विदर्भ हाउसिंग सोसायटी गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाला मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रसाद बनसोडे, वैद्यकीय अधिकारी मनीषा त्रिपाठी, जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय राठोड, गणेश मंडळाचे उपाध्यक्ष नयन जयस्वाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता निधी व इतर शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यासोबतच आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित