शासकीय वसतिगृहातील प्रवेश अर्जासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतीगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह, आधार व स्वयंम या योजना १२ च्या नंतर व्यावसायिक
व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असून या योजनेची प्रवेश
प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली होती.
त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई
फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ योजनेतंर्गत रिक्त असलेल्या जागेवर व्यावसायिक व अव्यावसायिक
विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु करण्यात आले होते.
परंतू जिल्ह्यातील वसतीगृहात http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर
अर्ज करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील
नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी १5 सप्टेंबर २०२६ पर्यंत
मुदतवाढ देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे
सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment