बंदर गावात भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप शिबीर

 



            यवतमाळ, दि.29 (जिमाका) : राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पारधी बेडे, कोलाम पाडे, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या वस्त्यांमधील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

            या मोहिमेअंतर्गत राळेगाव तालुक्यातील बंदर या गावात भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिराचे काल आयोजन करण्यात आले होते.

            या शिबिरात गावातील नागरिकांना विविध योजनांची व प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली.

या शिबिराला मंडळ अधिकारी, तलाठी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित