पुसद येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा
यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद जिल्हा यवतमाळ येथे सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधुन रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ही योजना न्युक्लिअस बजेट योजनांतर्गत आदिवासी लाभार्थ्याना वजनकाटा, टोपली, कॅरेट व छत्री इत्यादी वस्तुचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, तसेच प्रमुख अतिथी म्हणुन पद्मभूषण राजगुरु, शशांक कदम, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, कृषी अधिकारी अमोल आघव, अनिल पाटील, दिनकर गुल्हाणे हे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. रानभाजी स्टॉलचे उदघाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आशिष बिजवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबत सर्व मान्यवर कर्मचारी, आदिवासी समाज बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुसद कार्यक्षेत्रातील आदिवासी बांधवानी रानभाज्याचे प्रदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने फांज, कर्टुले, हडसन, चिलीभाजी, आवळा, रानकांदा, वावडींग, पडोळ, रानशेरण्या, गुळवेल, रानघोळ, पिवळवेल, गावराण भेंडी, आबांडी व वनऔषधी इत्यादीचा समावेश होता. ह्या रानभाजी महोत्सवामध्ये शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा पुसद व वडगांव (शिंदे) येथील विद्यार्थ्यांनी सुध्दा रानभाज्याचे स्टॉल लावुन उपस्थितांना रानभाज्याबाबत माहिती दिली व उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांनी रानभाज्याची खरेदी केली.
रानभाजी महोत्सव उपस्थित असलेल्या विद्यार्थी कर्मचारी अधिकारी आदिवासी पालक व बंधू भगिनी यांना रानभाज्यांचे महत्त्व व त्या खाण्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त आहेत. यांचे महत्त्व उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी सांगितले. तसेच तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी हंगामातील रानभाज्या व त्या मिळण्याचे ठिकाण शरीरासाठी त्यांचा उपयोग हे सर्व समजून सांगितले. आठवड्यातून पुसद शहरांमध्ये एकदा सर्वांना रानभाज्या उपलब्ध होण्यासाठी आदिवासी बंधू-भगिनी यांना बाजारात जागा उपलब्ध व्हावी अशी इच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी व्यक्त करुन सेवा संकल्प अभियाना अंतर्गत रानभाजी महोत्सव व लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप याविषयी मार्गदर्शन व उद्देश आपल्या मार्गदर्शीनिय भाषणातून केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उमाकांत कोटुरवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव तर आभार प्रदर्शन अरुण चव्हाण यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी सर्व कर्मचारीवृंद, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याच्या प्रयत्नातुन सदर रानभाजी महोत्सव कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
000
.jpeg)


Comments
Post a Comment