जिल्ह्यात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’


> २० ठिकाणी आयोजन

> युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी


> इच्छूकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर  रोजी महाराष्ट्रातील ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातही तब्बल २० ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील विविध तालुके तसेच औद्योगिक परिसरांमध्ये हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

त्यानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, यवतमाळ, जाजू महाविद्यालय, यवतमाळ, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ तसेच वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय व महाविद्यालय यवतमाळ येथे रोजगार मेळावे होणार आहेत. याशिवाय वणी, पांढरकवडा, उमरखेड, घाटंजी, पुसद, गूंज(महागाव), आर्णी, दिग्रस, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब, दारव्हा, नेर आणि झरी जामणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

उमेदवारांना https://forms.gl/MzGcww या लिंकवर माहिती भरता येणार आहे. तसेच ‘महास्वयम्’ पोर्टलवर जाऊन ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या विभागातील ‘नोकरी इच्छुक उमेदवार नोंदणी अर्ज’ या पर्यायावर क्लिक करून रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करता येणार आहे. या मेळाव्यांमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यादी सोबत जोडली आहे

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित