सामाजिक न्याय योजनांविषयी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

 



सेवा संकल्प अभियानांतर्गत पुसद येथे आयोजन

       यवतमाळ, दि.22 (जिमाका) : शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मंगळवार कार्यशाळा घेण्यात आली. 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ ए.वी. वानखेडे, प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मुन उपस्थित होत्या. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वस्तीगृह प्रवेशाची माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेत सुमारे ४८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आर पी गोडबोले व दीपक भालेकर यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित