मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्या उपस्थितीत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ

 


पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत कार्यक्रम

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत मनपूर ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्या उपस्थितीत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) जालींदर आभाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, गटविकास अधिकारी पद्माकर मडावी उपस्थित होते.

 या अभियानाअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप, जन्म व मूत्यू प्रमाणपत्र वाटप, दिव्यांगाना धनादेश वाटप, विकसित भारत राष्ट्रीय आजीविका मिशन अंतर्गत जॉब कार्ड वाटप, स्तनदा माता यांना किट वाटप व शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांनी आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य तपासणी कॅम्प व महिला  बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावातील महिला-पुरुष व विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित