पुसद येथे ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत जनजागृती

 

> श्रीगणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत आरोग्य शिबीर

> आयुष्मान भारत योजना, सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभरात ‘लोकसंवाद-२०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम व आरोग्य विभागामार्फत श्रीगणेशा आरोग्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 या उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय पुसद, जिल्हा माहिती कार्यालय आणि पुसदचा राजा गणेश मंडळ माळीपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पुसद येथील पुसदचा राजा गणेश मंडळ माळीपुरा येथे ‘लोकसंवाद कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रसाद बनसोड, वैद्यकीय अधिकारी भेलोंडे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

 

कार्यक्रमाला नगरसेविका विशाखा गवळी, उपजिल्हा रुग्णालय पुसदचे डॉ. रती वावधने, डॉ. बंधन वाठोरे, सायबर विभागाचे एपीआय गजानन कारेवाड, जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय राठोड, पुसदचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश चोपडे तसेच समाजसेवक समीर गवळी यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. बंधन वाठोरे यांनी आयुष्मान भारत योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच सायबर विभागाचे एपीआय गजानन कारेवाड यांनी नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व आवश्यक माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांची आरोग्य तपासण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी माळीपुरा येथील पुसदचा राजा गणेश मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवर, डॉक्टर, अधिकारी व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित