हिवरा संगम येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी
यवतमाळ, दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार किसन वानखेडे, आमदार राजू तोडसाम, तहसीलदार
अभय म्हस्के, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, नितीन भुतडा, आरती फुफाटे, जयश्री राठोड,
दत्ता राहाणे, योगेश राजे, साहेबराव कदम तसेच शेतकरी उपस्थित होते.

Comments
Post a Comment