हिवरी आश्रमशाळेत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि विधी सेवा कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, हिवरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नालसा जागृतीअंतर्गत न्याय तळागाळातील माहिती आणि पारदर्शकतेसाठी जागरूकता उपक्रम, २०२५ व अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२’ या विषयावर दि. २७ ऑक्टोबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेश उगे होते. यावेळी शिक्षिका मिनाक्षी खंडाळकर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर ललिता गोरे आणि सहाय्यक लोकअभिरक्षक तृप्ती आसवा उपस्थित होत्या. कार्यक्रमात तृप्ती आसवा यांनी विधी सेवा कायदा, १९८७ बाबत माहिती...