Posts

Showing posts from May, 2026

शेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा

 10 जूनपासून स्पर्धेला सुरुवात  15 ऑगस्ट रोजी विजेत्यांचा गौरव जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी जिल्ह्यात आगळीवेगळी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी गटांच्या सदस्यांना करावयाच्या कामांचे चार स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरामध्ये चार ते पाच लघु कृती अथवा अ‍ॅक्टिव्हिटी देण्यात येणार असून त्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना गुणांकन दिले जाईल. स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कृतींचे व्हिडिओ चित्रण, छायाचित्रे तसेच नोंदवही ठेवणे सहभागी सदस्यांसाठी आवश्यक राहणार आहे. चारही स्तर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना आंतरराज्य, राज्य व जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. विजयाचे चार स्तर या फार्मर ग्रुप लिग स...

पेट्रोल पंपांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ; शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याच्या सूचना

Image
यवतमाळ, दि. २७ : जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यामध्ये दर्डा नगर येथील जैस्वाल पेट्रोल पंप तसेच पांढरकवडा रोडवरील धनगंगा पेट्रोल पंप येथे भेट देऊन त्यांनी तपासणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कार्यालयातील नोंदवही, वर्षनिहाय इंधन पुरवठ्याची माहिती, संबंधित दस्तावेज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या. या पाहणीवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित पेट्रोल पंप चालक उपस्थित होते. 000

स्वाधार योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 30 मेपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 30 मेपर्यंत ऑनलाईन अर्जाताल त्रृटी पूर्ण करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील, असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 30 मेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल !

 जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी  शेत मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा  पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरु असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह ४० लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालक व मालकांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा आहे. परंतु समाज माध्यमांवर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेचं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोल सारख्या ज्वलनशील...

तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सुविधा केंद्र सुरू

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मधील तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांना २० मे ते २२ जून या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता आणि प्रवेश अर्ज शुल्क इत्यादी बाबींची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत दहावीनंतर पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य ती मदत व्हावी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात, तसेच त्यांच्या विविध समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी या केंद्रामधून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरण्...

पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित

 नामांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल  ३१ जुलैपर्यंत मुदत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांसाठी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव अथवा शिफारस मागविण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या संदर्भातील अधिनियम व नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र व शिफारस करण्यायोग्य व्यक्तींचे प्रस्ताव किंवा शिफारस दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिका...

शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा; नागरिकांनी स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे यावे

उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी रक्तदात्यांना दररोज रक्तकेंद्रात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान ही एक मौल्यवान जीवनरक्षक देणगी आहे. आणि सदर देणगी ही सुरक्षित आणि शाश्वत रक्तपुरवठा आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज तयार करण्यासाठी मुख्य स्रोत आहे. सिकलसेल अनिमिया आणि थैलेसेमिया यांसारख्या परिस्थितीसाठी आणि नियमित रक्तपुरवठा आवश्यक असलेल्या अनेक रुग्णांसह सर्व गरजू रुग्णांसाठी ऐच्छिक-सुरक्षित रक्तपुरवठा करणे आवश्यक आहे. हिमोफिलिया आणि रोगप्रतिकारक कमतरता यांसारख्या दीर्घकालीन परिस्थिती असलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान मोहीम देखील महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तसंक्रमणावर अवलंबून असलेल्या ...

ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसा...

यवतमाळ येथे २ जून रोजी डाक अदालत

 टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर तक्रारींचे निवारण होणार यवतमाळ विभागाच्या अधीक्षक डाकघर कार्यालयाच्या वतीने दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता अधीक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, यवतमाळ येथे यडाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही अथवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक तसेच मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारी करताना संबंधितांनी संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यास पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम आदी माहितीचा समावेश असावा.संबंधितांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर, यवतमाळ ४४५००१ यांच्या नावे दि. १ जून २०२६ पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचतील अशा रीतीने पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर...

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

 दावे व हरकतींसाठी २९ मेपर्यंत मुदत  ४ जूनला अंतिम मतदार यादी यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला असून, त्यानुसार दि. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाची निवडणूक घोषित केल्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व नगर परिषद व नगर पंचायत सदस्यांची यादी संबंधित कार्यालयांकडून प्राप्त करून घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार याद्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय येथे दि. २३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांवर दि. २९ मे २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर दि. ३१ मे २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिक...

पाणीटंचाई निवारण : आर्णी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अरुणावतीचे पाणी!

 जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश  नागरिकांना दिलासा आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिफारस केली होती. सद्यस्थितीत अरुणावती प्रकल्पाच्या धरणात ७१.०९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एक दशलक्ष घनमीटर पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, पाणी पट्टी देयकाची रक्कम भरण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार...

वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी शेवटची संधी !

 ३० जूनपर्यंत मुदतवाढ जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्याच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदतवाढ दिली असून वाहनधारकांना आता ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एचएसआरपी नंबर प्लेटसाठी रोसमेर्टा सेफ्टी सिस्टिम लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींगसाठी mhhsrp.com हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. वाहनधारकांना या पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेता येणार आहे. यापुर्वी यासाठी दि.१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, त्यास आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून ३० जून २०२६ पूर्वी वाहन मालकांनी त्यांच्या वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसवुन घ्यावी, दि.१ जुलै २०२६ नंतर एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी विहित शुल्काचा भरणा करुन वाहनास ...

राजकीय पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवा

 जिल्हा प्रशासनाचे यंत्रणांना निर्देश  विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुका-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय इमारतींवर अथवा परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे लिखाण, प्रचारात्मक मजकूर, फलक तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र प्रदर्शित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. याबरोबरच “महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम” मधील तरतुदींचे उल्लंघन होऊ नये आणि आदर्श आचारसंहितेच...

विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज रहा

Image
- जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अधिकाऱ्यांना निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा  जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा विधानपरिषद निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी अधिकाऱ्यांना दिले. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश झिमटे, उपजिल्हाधिकारी अजित येळे, कार्यकारी अभियंता व्ही.ए.शिरभाते, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, तहसिलदार राहूल मोरे इ. विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, शासनाच्या संकेतस्थळ, समाजमाध्यमांवरुन राजकीय नेत्यांचे छायाचित्...

विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 आदर्श आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था  प्रशिक्षण व माध्यम व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी निश्चित महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी तसेच निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी व कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन, संगणकीकरण व मतदान,मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल मोरे, तर प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी अजितकुमार येळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्...

आचारसंहितेमुळे यवतमाळ येथील रोजगार मेळावा रद्द

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तथा प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या दि. १८ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दि. २६ मे रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जाहीर केले आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे उद्योजक, उमेदवार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य...

जिल्ह्यात जनगणनेला प्रारंभ !

 प्रत्यक्ष घरगणना सुरु  प्रगणकांना सहकार्य करा -जिल्हा प्रशासनाचे आवाहन आगामी जनगणना २०२७ ही देशातील सर्वात व्यापक व महत्त्वपूर्ण प्रशासनिक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्यास दि. १६ मे पासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरभेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत. घरगणनेदरम्यान प्रगणक घरांवर मार्कर किंवा खडूने क्रमांक चिन्हांकित करीत आहेत. जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, बँक खाते तपशील किंवा ओटीपी मागितला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांचीच विचारणा करण्यात येणार आहे. जनगणना कार्य हे जनगणना अधिनियम, १९४८ अंतर्गत केले जात असून प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना घरांमध्ये प्रवेश करून माहिती घेण्याचा तसेच घरांना क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जनगणनेत नोंदविण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात ये...

शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार! अनुदानित खतांसोबत विना-अनुदानित उत्पादनांच्या टॅगिंगवर बंदी

 सक्ती करणाऱ्या खत कंपन्यांवर होणार कठोर कारवाई  जिल्ह्यात शासन परिपत्रकाची कडक अंमलबजावणी सुरू  अनुदानित रासायनिक खते सोडून इतर उत्पादनांच्या पुरवठा, विक्रीस मनाई राज्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या कृषि विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात काही खत उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांकडून अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीसोबत विना-अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते आणि जैवउत्तेजके यांची सक्तीने विक्री (टॅगिंग/लिंकिंग) केली जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, शासनाने २० मे २०२६ रोजी विशेष परिपत्रक काढून अशा प्रकारच्या टॅगिंगवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या रसायने व खते मंत्रालयाने खतांसोबत इतर उत्पादनांचे टॅगिंग करणे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे हित आणि खरीप हंगामाची तातडी लक्षात घेता, आता खत कंपन्यांना त्यांच्या परवान्यातील अनुदानित रासायनिक खते सोडून इतर कोणत्याही विना-अनुदानित खतांचा किंवा निविष्ठांचा पुरवठा व विक्...

दहावीत शासकीय निवासी शाळांचा शंभर टक्के निकाल

 विद्यार्थीनींचे घवघवीत यश  मोहिनी पाईकराव अमरावती विभागात प्रथम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सातही निवासी शाळांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला असून शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, महागाव येथील तब्बल ११ विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये आरुषी अनिल जाधव व उपेक्षा गौतम खंदारे यांनी प्रत्येकी ९३.४० टक्के गुण मिळविले. तन्वी देवेंद्र भगत हिने ९२.४० टक्के, दर्शना दिलीप नरवाडे हिने ९१.४० टक्के, कांचन रामचंद्र वानखेडे हिने ९१.४० टक्के, संजीवनी गजानन वानखेडे हिने ९१.२० टक्के, अप्रजिता माधव सोंगाडे ९१ टक्के, श्रुतिका विनोद इंगोले, प्राजली गजानन जाधव व समता दलित कांबळे यांनी प्रत्येकी ९०.६० टक्के तर नियती चिंतामण ख...

वेडशी येथे दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात

कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या फार्मर कप उपक्रमांतर्गत राज्यभर दशपर्णी अर्क बनविण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे तेजस्वी शेतकरी गटाच्या वतीने दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. रासायनिक शेतीच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे जमीन नापीक होत असून वायू, मृदा व जलप्रदूषणातही मोठी वाढ होत आहे. फळे, भाजीपाला, धान्य व डाळींमध्ये विषारी अंश आढळून येत असल्याने कर्करोग, हृदयरोग, शुगर, दमा, लकवा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची या पार्श्वभूमीवर गावोगावी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. तेजस्वी शेतकरी गटाच्या निमंत्रक सीमा चंद्रमणी पाटील व सदस्यांनी पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्काचे महत्त्व जाणून घेतले. कमी खर्चात घरच्या घरी प्रभावी कीड नियंत्रण करता येत असल्याने तसेच रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत होत असल्याने सदस्यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला. गटातील सदस्यांनी गोमूत्र, शेण, लसणाचा ठेचा, मिरचीचा ठेचा तसेच जनावरे न खाण...

चिंचोली येथे माती परीक्षणातून समृद्ध शेतीकडे वाटचाल

 भोजाजी महाराज शेतकरी गटाचा शास्त्रयुक्त व कमी खर्चाच्या शेतीचा संकल्प चिंचोली येथील शेतकऱ्यांनी माती परीक्षण, सेंद्रिय उपाययोजना आणि गटशेतीच्या माध्यमातून समृद्ध शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. अमोल ठाकरे व इतर शेतकरी पाणी फाउंडेशन अंतर्गत आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 च्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी वरोरा येथे सहभागी झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून भोजाजी महाराज शेतकरी गटाची स्थापना केली. “एक काठी सहज मोडता येते; पण शंभर काठ्या एकत्र आल्या तर मोडता येत नाहीत,” या उक्तीप्रमाणे गटशेतीतून शेतकऱ्यांची ताकद अनेक पटींनी वाढते, ही भावना गटातील सदस्यांनी व्यक्त केली. कृषी विभाग महाराष्ट्र शासन, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रयुक्त व कमी खर्चातील शेती करून अधिक उत्पादन घेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. गटातील सदस्यांनी शेतातील मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने काढून प्रयोगशाळेत पाठवले आहेत. माती परीक्षण अहवालाच्या आधारेच सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेरणी करताना उताराला आडवी...

प्रगती महिला शेतकरी गटाने तयार केला ४०० लिटर दशपर्णी अर्क

 पिंपळापुर येथे सेंद्रिय शेतीचा आदर्श उपक्रम  सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभाग राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथे प्रगती महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला. कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप अंतर्गत गटातील महिलांनी चारशे लिटर दशपर्णी अर्क तयार केला. रासायनिक खते, कीडनाशके, तननाशके, बुरशीनाशके व संजीवकांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची सुपीकता कमी होत असून प्राणी, पर्यावरण आणि मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत असून उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गटबांधणी करुन शेतकऱ्यांनी एक्त्रित गटशेती व सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. प्रगती महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक शारदा नहाते यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी जनावरे न खाणाऱ्या दहा प्रकारच्या वनस्पती, मिरचीचा ठेचा, लसणाचा ठेचा, गोमूत्र, शेण व पाणी यांचा वापर करून दशपर्णी अर्क तयार केला. या अर्कामुळे कमी खर्चात प्रभ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू

 योजना, नोंदणी मार्गदर्शन, अर्ज स्थिती आता व्हॉट्सॲपवर मिळणार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे वैयक्तिक व गट कर्ज योजनांतील अर्जाची स्थिती, मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य आता थेट व्हॉट्सॲप वर मिळणार आहे. चॅटबॉटचा वापर कसा करायचा : सर्वप्रथम व्हॅाट्सॲपमध्ये ८९७६८५५९२१ या क्रमांक सेव्ह करुन "हाय" पाठवावा नंतर मेनु उघडेल. तिथून महामंडळ योजनांची माहिती, नवीन नोंदणी मार्गदर्शन, पात्रता प्रमाणपत्र (एल.ओ.आय) स्थिती व डाउनलोड, बँक कर्ज मंजुरी स्थिती, व्याज परतावा दावा स्थिती आणि तांत्रिक अडचण नोंदवणे या पर्यायांपैकी सेवा निवडणे. या सर्व सेवा ओटीपी आधारित पडताळणी करुन लाभार्थ्यांना मिळणार आहेत. महामंडळाने "वन क्लिक इनफॉरमेशन" या संकल्पनेतून ही सेवा विकसित केली आहे. स्वयं नोंदणी, एल.ओ.आय, बँक मंजुरी व व्याज परतावा दाव्यासाठी प्रशिक्षण व्हिडिओही बॉट मध्ये उपलब्ध आहेत. विभागीय कार्यालय संपर्काची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. चॅटबॅाटचे फायदे: या प्रणालीमुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन भेटी कमी ...

शिक्षक पात्रता परीक्षा २८ जूनला होणार

 ४७ केंद्रांची व्यवस्था महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२६ ची तारीख बदलण्यात आली असून आता ही परीक्षा दि. २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत देशभरात नीट परीक्षा होणार असल्याने आणि दोन्ही परीक्षांची अनेक केंद्रे समान असल्यामुळे परीक्षार्थींच्या सोयीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) ची २१ जून ऐवजी २८ जून रोजी होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथ) प्रकाश मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी ५ हजार १९१ तर दुसऱ्या पेपरसाठी ६ हजार ८५४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यात १९ परीक्षा केंद्रांची तर दुसऱ्या पेपरसाठी २८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी १६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रत काढून घ्यावी तसेच परी...

आदिवासी कल्याण योजनांच्या जनजागृतीसाठी जनभागीदारी अभियान

 १८ ते २५ मेदरम्यान माहिती, शिक्षण व संवाद शिबिरांचे आयोजन  ५०९ गावांमध्ये होणार जनजागृती केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी कल्याण योजनांच्या जनजागृतीसाठी पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत १८ ते २५ मे या कालावधीत जनभागीदारी अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ५०९ गावांमध्ये माहिती, शिक्षण व संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी दिली आहे. या अभियानाच्या माध्यमातून २१९ धरती आबा आणि २९० जनमन अभियानातील गावांमधील आदिवासी समाजापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणे, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती, लाभार्थी संपृक्तता शिबिरांचे आयोजन, तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता, आदिवासी सेवा केंद्रात तक्रारींची नोंद घेवून जनसुनावणीद्वारे निवारण करणे, आरोग्य तपासणी, सिकलसेल आजार, पोषणाबाबत जनजागृती करणे, आदिवासी युवक महिला उद्योजकांच्या यशोगाथा निर्माण करणे, आदिकर्मयोगी पोर्टलचा प्रचार प्रसार करणे इ. उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात ही मोहीम प्राध...

विधानपरिषद निवडणूक काळात शस्त्र बाळगण्यावर बंदी

 जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम १८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यात शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांना शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि शस्त्रांचा संभाव्य गैरवापर टाळणे हा या आदेशामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांविरुद्ध पोलीस विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आ...

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीसंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मारोती पवार यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत ई-केवायसीसाठी महिलांना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. या अफवांमुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शहर व तालुकास्तर कार्यालयात महिलांचा जमाव होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांनी चुकीच्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना औषध पुरवठ्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

• औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार दि. २० मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित व सुरळीत उपलब्ध राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सतर्क असून हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त गजानन घिरके यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अखंडित औषध पुरवठा राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने केमिस्ट संघटनांसोबत समन्वय साधला आहे. सह आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी संपर्क साधण्यात आला असून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमां...

अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान

 पात्र बचत गटांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार सन 2026-27 या वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाकरिता 90 टक्के शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हातील पात्र अनुसूचित जातीच्या बचत गटांनी आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

-तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन > सत्यापन अ‍ॅपवर मिळतो प्रमाणपत्र यवतमाळ शहरातील सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नगर परिषद क्षेत्र, यवतमाळ अंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना स्वतः (मोबाईल उपलब्ध असल्यास) अथवा इतर कोणत्याही नातेवाईकांमार्फत तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप’द्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. योगेश देशमुख व नायब तहसिलदार राजेश चिंचोरे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी स्वतः करावयाची कार्यपद्धती सर्वप्रथम लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअर आयओएस वरून ‘बीएसए (बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप)’ तसेच ‘आधार फेस आरडी’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर बेनीफीसीअरी सत्यापन अ‍ॅप मध्ये लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी भाषा निवडून “प्रोसीड फॉर डिव्हाईस रजिस्ट्रेशन” येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्...

भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदावर प्रशिक्षणकरीता युवक-युवतींसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सी डी एस) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सी डी एस कोर्स क्रमांक ६७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये निवास, भोजन व प्रशिक्षणाची संपूर्ण मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवक-युवतींना सैन्यदलातील अधिकारी पदासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक ०५ जून २०२६ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांनी mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डीएसडब्ल्यू पोर्टलवरील ‘पीसीटीसी नाशिक सीडीएस-६७ संदर्भातील माहिती विभाग’विभागातून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे क...

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 १८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी  मतदारसंघात आचारसंहिता लागू राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकरी मतदारसंघांतील विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचाही समावेश असून १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या १८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार १६ रिक्त जागांसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक कार्यक्रम झाला आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले आहे. बॉक्स असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम: निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २५ मे २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख : १ जून २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्रांची छानन...

खरीप हंगामात 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्री !

 शेतकऱ्यांनी ‘अष्टसुत्रीचा’ अवलंब करावा  जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यावर्षी 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, खरीप हंगाम सुरक्षित करण्यासाठी कृषी विभागाने काही 'लक्ष केंद्रित बाबी' निश्चित केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामत 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्रीचा अवलंब करून आपले उत्पन्न सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. त्यानुसार पेरणीचे प्रगत तंत्रज्ञान, बीबीएफ तंत्राचा वापर, पाणी व मृदा संधारण, मृदा आर्द्रता, पीक व बियाणे नियोजन, फळबागा संरक्षण, खते व सिंचन व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन ही अष्टसूत्री निश्चित करण्यात आली आहे. या अष्टसुत्रीनुसार जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी उताराला आडवी पेरणी करावी. प्रत्येक गावात किमान ३० टक्के शेतकऱ्यांनी 'रुंद वरंबा सरी' (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी. शेततळे तयार करुन पावसाचे पाणी साठवण्यावर भर द्यावा. मल्चिंग, सेंद्रिय खत आणि मूलस्थानी जलसंधारणाचा वापर करून जमिनीचा ओलावा टिकवा. बदलत्या वातावरणात तग धरतील अशा 'हवामान अनुकू...

२२ मेपर्यंत उष्णतेची लाट : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी !

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने यवतमाळ जिल्ह्यात २२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक, कामगार तसेच विविध शासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घेवून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी, ओआरएस, लिंबूपाणी व फळांचे सेवन करावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. बंद वाहनात मुले किंवा प्राणी ठेवू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे. बांधकाम, शेती, रस्ते कामे व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी थेट उन्हात सलग काम टाळावे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी कामाचे नियोजन करावे...

खरीप हंगाम : जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहित ी खरीप हंगाम २०२६ साठी यवतमाळ जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यात विविध खतांचा एकूण १ लाख ३९ हजार ९२४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी ३१ हजार ४८९ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून विक्रेत्यांकडे अद्याप १ लाख ८ हजार ४३५ मेट्रिक टन शिल्लक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, युरिया खताचा २८ हजार ७४१ मेट्रिक टन साठा उपलब्ध होता. त्यापैकी ९ हजार ६३१ मेट्रिक टन विक्री झाली असून १९ हजार ११० मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. डीएपी खताचा ९ हजार ७८८ मेट्रिक टन साठा उपलब्ध असून त्यातील २ हजार २९६ मेट्रिक टन विक्री झाली आहे. विक्रेत्यांकडे ७ हजार ४९२ मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे. एमओपी खताचा २ हजार ५८४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून त्यापैकी ५२७ मेट्रिक टन विक्री झाली आहे. संयुक्त खतांचा सर्वाधिक ६९ हजार १५५ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध झाला होता. त्यातील १४ हजार ७७६ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून ५५ हजार १८० मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक ...

खरीप हंगामात जिल्ह्यात ७१ टक्के खतांचा बफर साठा पूर्ण

जिल्हाधिकारी विकास मीना खरीप हंगाम २०२६ साठी यवतमाळ जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगाने सुरू असून १८ मे २०२६ पर्यंत एकूण ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा एकूण ७ हजार ८५० मेट्रिक टन बफर साठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार ५८६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून २ हजार २६४ मेट्रिक टन साठा अद्याप बाकी आहे. युरिया खतासाठी ६ हजार ५५० मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ५४१ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून ६९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. डीएपी खतासाठी १ हजार ३०० मेट्रिक टन उद्दिष्टापैकी १ हजार ४४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. संस्थावार पाहता, एमएआयडीसीने एकूण बफर साठा उद्दिष्टाच्या मेट्रिक टन उद्दिष्टापैकी ७९ टक्के पूर्तता केली आहे. या संस्थेकडे युरियाचा आणि डीएपीचा एकूण १ हजार ८४९ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी ४९१ मेट्रिक टन बफर साठा बाकी आहे. व्हीसीएमएफने युरिया आणि डिएपीचा एकूण ५ हजा...

कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता करणाऱ्या कृषी केंद्रांना दणका !

 ३८ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित  १५ परवाने कायमस्वरूपी रद्द  कृषी विभागाची धडक कारवाई मोहीम जिल्ह्यात सध्या पेरणीची तयारी सुरू असून शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट मोडवर आला असून कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके विक्री केंद्रात अनियमितता केल्यामुळे एकूण ३८ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित व १५ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ, वणी, व कळंब तालुक्यात अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री प्रकरणी एकूण ३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत कापूस बियाण्यांचे ६३१ पॅकेट व तीन वाहने जप्त करण्यात आले असून एकूण २२.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे अनधिकृत बोगस रासायनिक खत विक्री प्रकरणी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून ७०० बॅग व १ वाहन जप्त करण्यात आले त्याचे एकूण जप्त साठ्याचे मूल्य १८ लाख रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याव...

जिल्ह्यात 6,836 शेत पाणंद रस्त्यांचे नियोजन

मा.जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती  मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती  अंदाजे 1502 कोटी रुपये खर्च लागणार  एकूण 11 हजार 540 किमी लांबीचे रस्ते निश्चित ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करून वाहतुकीस चालना देण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना” अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामांना गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रांमध्ये एकूण 6 हजार 836 शेत पाणंद रस्ते निश्चित करण्यात आले असून सुमारे 11 हजार 540 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी अंदाजे 1502.88 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पाच वर्षात टप्प्याटप्प्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन, जिल्हा नियोजन, खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध केला जाणार असून त्यामाध्यमातून शेत पाणंद रस्त्यांची कामे केली जा...

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच मतदार याद्या अधिक अचूक व पारदर्शक करण हा मुख्य उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ राहणार असून २० जून ते २९ जून या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे पार पडतील. तसेच ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी घेऊन प्रगनणा करण्यात येणार आहे. तसेच २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येईल. ५ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचे निवार...

इस्त्राईलमध्ये आरोग्य क्षेत्रात नोकरीची संधी

 होम बेस्ड केअरगिव्हरचे ३५०० पदे रिक्त  १ लाख ९९ हजार रुपये प्रति महिना मिळणार पगार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पामार्फत इस्त्राईल देशात आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील कुशल युवक-युवतींना जागतिक रोजगार बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत इस्त्राईलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ (घरगुती काळजीवाहू) पदासाठी एकूण ३५०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ९० टक्के महिला व १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobApply.aspx या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे. किमान १० वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केल्याचे भारतीय मान्यताप्राप्त प्...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

Image
 मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण व बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजनांवर मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. “नागरिकांचे मूलभूत कर्तव्य तसेच वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यांचे फायदे, नालसा मुलांसाठी बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजना २०२४, पोक्सो कायदा तसेच जागृती न्याय तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रम योजना २०२५” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळचे सचिव दिपक एच. दाभाडे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता अंजली एम. गहरवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुख्य लोकअभिरक्षक एस. टी. कुलकर्णी व पॅनल वकील सोनाल...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे ‘ट्रायबल फेलो’ची भरती

 २५ मे रोजी मुलाखतीचे आयोजन; २० हजार रुपये मिळणार मानधन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत दोन ट्रायबल फेलो पदांच्या निवडीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड १० महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजेपासून वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रायबल फेलो पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संगणक व इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते २६ वर्षांदरम्यान असावे. याशिवाय किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव (इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप किंवा स्वयंसेवी संस्थेमधील अनुभव) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आदिवासी क्षेत्रात आदिवासी समुदायासोबत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य राहील....

महाराजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना ३ लाख १६ हजार दाखले, प्रमाणपत्र वितरित

Image
 ७ मार्च ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  ६६ हजार डिजिटल सातबारे वितरित राज्य शासनाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १०९ मंडळांमध्ये ७ मार्च ते १५ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत आयोजित शिबिरांना सर्वच मंडळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या समाधान शिबिराअंर्तगत आतापर्यंत विविध प्रकारचे ३ लाख १६ हजार ७१८ दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम व पत्रकार बांधव उपस्थित होते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरामध्ये आरोग्य, शिक्षण, पोलीस, पशुसंवर्धन, कृषी आदी २२ विभाग एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनेची माहिती व लाभ देण्यात आला. तसेच आतापर्यंत झालेल्या सर्वच शिबिरामध्ये महसूल...

महिला लोकशाही दिन 18 मे रोजी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

हस्तलिखित वारसांच्या जतन, संवर्धनासाठी ‘ज्ञान भारतम् अभियान

हस्तलिखितांची डिजिटल नोंद करता येणार ! ‘ज्ञान भारतम् पोर्टल, ॲपवर हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने देशभरात ‘ज्ञान भारतम्’ प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारसाचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी हा महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे. पुराभिलेख संचालनालय, यांनी दिलेल्या ‘ज्ञान भारतम्’ तसेच संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शकनुसार देवस्थान, न्यास व संस्थांकडे उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपमध्ये नोंदविण्याच्या सूचना संबंधित विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘ज्ञान भारतम्’ पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचीन साहित्य, जसे हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे आणि तत्सम साहित्याची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान, न्यास व संस्थांनी पोर्टलवर करावयाची आहे. धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे तसेच वाचनालय तसेच हस्तलिखितांचे जतन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहि...

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Image
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.