विधानपरिषद निवडणूक काळात शस्त्र बाळगण्यावर बंदी

 जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम १८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्ह्यात शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांना शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि शस्त्रांचा संभाव्य गैरवापर टाळणे हा या आदेशामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांविरुद्ध पोलीस विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती