यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 १८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी  मतदारसंघात आचारसंहिता लागू राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकरी मतदारसंघांतील विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचाही समावेश असून १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या १८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार १६ रिक्त जागांसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक कार्यक्रम झाला आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने २६ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले आहे. बॉक्स असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम: निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २५ मे २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख : १ जून २०२६ (सोमवार) नामनिर्देशन पत्रांची छाननी : २ जून २०२६ (मंगळवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ जून २०२६ (गुरुवार) मतदानाचा दिवस : १८ जून २०२६ (गुरुवार) मतदानाची वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतमोजणी : २२ जून २०२६ (सोमवार) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : २५ जून २०२६ (गुरुवार)

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती