ड्रोन उडवण्याचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणार; अधिकृत परवाना घेऊन सुरू करा व्यवसाय

 खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेची योजना अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मुख्यत्वेकरुन शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण,एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो.नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएची सुरक्षित उड्डाण नियमावली,तसेच आधूनिक ड्रोन हाताळणी,ड्रोन हाताळणी,ड्रोनचा मेन्टेनन्स वैगरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्स मध्ये दिले जाते. प्रात्याक्षिक ज्ञानावर भर हे या कार्सचे वैशिष्टय आहे.कोर्स कालावधी १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ? खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. नियम : उमेदवार वर दिलेल्या लक्ष्यित गटातील असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. अन्य सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला घेणे आवश्यक. या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9112227633 ही योजना अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवली जात आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती