पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित

 नामांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल  ३१ जुलैपर्यंत मुदत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांसाठी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव अथवा शिफारस मागविण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या संदर्भातील अधिनियम व नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र व शिफारस करण्यायोग्य व्यक्तींचे प्रस्ताव किंवा शिफारस दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती