शिक्षक पात्रता परीक्षा २८ जूनला होणार

 ४७ केंद्रांची व्यवस्था महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२६ ची तारीख बदलण्यात आली असून आता ही परीक्षा दि. २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत देशभरात नीट परीक्षा होणार असल्याने आणि दोन्ही परीक्षांची अनेक केंद्रे समान असल्यामुळे परीक्षार्थींच्या सोयीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) ची २१ जून ऐवजी २८ जून रोजी होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथ) प्रकाश मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी ५ हजार १९१ तर दुसऱ्या पेपरसाठी ६ हजार ८५४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यात १९ परीक्षा केंद्रांची तर दुसऱ्या पेपरसाठी २८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी १६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रत काढून घ्यावी तसेच परीक्षेच्या बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान