भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदावर प्रशिक्षणकरीता युवक-युवतींसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सी डी एस) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सी डी एस कोर्स क्रमांक ६७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये निवास, भोजन व प्रशिक्षणाची संपूर्ण मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युवक-युवतींना सैन्यदलातील अधिकारी पदासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक ०५ जून २०२६ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांनी mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डीएसडब्ल्यू पोर्टलवरील ‘पीसीटीसी नाशिक सीडीएस-६७ संदर्भातील माहिती विभाग’विभागातून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५०३२ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती