स्वाधार योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 30 मेपर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 30 मेपर्यंत ऑनलाईन अर्जाताल त्रृटी पूर्ण करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील, असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 30 मेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.
Comments
Post a Comment