अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू

 योजना, नोंदणी मार्गदर्शन, अर्ज स्थिती आता व्हॉट्सॲपवर मिळणार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे वैयक्तिक व गट कर्ज योजनांतील अर्जाची स्थिती, मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य आता थेट व्हॉट्सॲप वर मिळणार आहे. चॅटबॉटचा वापर कसा करायचा : सर्वप्रथम व्हॅाट्सॲपमध्ये ८९७६८५५९२१ या क्रमांक सेव्ह करुन "हाय" पाठवावा नंतर मेनु उघडेल. तिथून महामंडळ योजनांची माहिती, नवीन नोंदणी मार्गदर्शन, पात्रता प्रमाणपत्र (एल.ओ.आय) स्थिती व डाउनलोड, बँक कर्ज मंजुरी स्थिती, व्याज परतावा दावा स्थिती आणि तांत्रिक अडचण नोंदवणे या पर्यायांपैकी सेवा निवडणे. या सर्व सेवा ओटीपी आधारित पडताळणी करुन लाभार्थ्यांना मिळणार आहेत. महामंडळाने "वन क्लिक इनफॉरमेशन" या संकल्पनेतून ही सेवा विकसित केली आहे. स्वयं नोंदणी, एल.ओ.आय, बँक मंजुरी व व्याज परतावा दाव्यासाठी प्रशिक्षण व्हिडिओही बॉट मध्ये उपलब्ध आहेत. विभागीय कार्यालय संपर्काची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. चॅटबॅाटचे फायदे: या प्रणालीमुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन भेटी कमी होणार असून अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व गती येईल. अर्जाची संपूर्ण स्थिती "एकाच चॅटमध्ये" मिळत असल्याने वेळ व खर्चाची बचत होईल. तसेच अनधिकृत एजंटवरील अवलंबित्व कमी होणार आहे. महामंडळाने यापूर्वीच अधिकृत मोबाईल ॲप देखील उपलब्ध केले आहे. व्यवसाय विस्तारासाठी वेब प्रणालीवर "व्यवसायवर्धन" टॅब सुरू करण्यात आला आहे. लाभार्थी त्यांची उत्पादने व सेवा ऑनलाईन प्रसिद्ध करू शकतील. भविष्यात "ई मार्केट प्लेस" ची सुविधाही देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. दरम्यान, भविष्यात व्हॉट्सॲप वरूनच एल.ओ.आय अर्ज प्रक्रिया उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांनी व्हॉट्सॲप चॅटबॉट व मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती