ज्वारी, बाजरी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ
रब्बी हंगाम 2025-26 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत महागांव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, उमरखेड, घाटंजी, कळंब व राळेगांव या नऊ ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे.
या खरेदी केंद्रामध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. पाटण,किसान मार्केट यार्ड शेलु(बु). पुसद, शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, (केंद्र दत्तरामपुर), तालुका खरेदी विक्री संघ मर्या. उमरखेड, तालुका खरेदी विकी संघ मर्या. घाटंजी, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. कळंब व तालुका खरेदी विक्री संघ मर्या. राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत करण्यात येणार होती. सद्यस्थितीत नोंदणी विचारात घेवुन शासनाने ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी दि. 31 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर स्वतः हजर राहुन ज्वारी, बाजरी, मका, रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय गाढवे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment