Posts

महाडीबीटी पोर्टल, शिष्यवृत्तीविषयी महिला महाविद्यालयात कार्यशाळा सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, दत्ता चौक, यवतमाळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कुटे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त मंगला मून उपस्थित होत्या. कार्यशाळेत अनुदानित महाविद्यालयांना महाडीबीटी पोर्टलद्वारे जमा होणारे शिक्षण शुल्क, महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देणे, शुल्क मान्यतेची (Fee Approval) सद्यस्थिती, सर्व अर्ज ३१ मार्च २०२७ पर्यंत मंजूर करून विद्यार्थ्यांना लाभ देणे, तसेच सन २०१९-२० पासून प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करणे या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य श...

राजुर येथे कोलाम समाजाच्या नागरिकांना थेट लाभ सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत वणी तालुक्यातील राजुर येथे १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात कोलाम प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष सेवा देणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध सेवा पुरवण्यात आल्या. शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोलाम प्रवर्गातील २७ लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी १९ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष विविध सेवा देऊन लाभाचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी एस. पी. डांगोले आणि ग्राम महसूल अधिकारी एस. पी. कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजुर येथे कोलाम समाजाच्या नागरिकांना थेट लाभ सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत वणी तालुक्यातील राजुर येथे १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात कोलाम प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष सेवा देणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध सेवा पुरवण्यात आल्या. शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोलाम प्रवर्गातील २७ लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी १९ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष विविध सेवा देऊन लाभाचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी एस. पी. डांगोले आणि ग्राम महसूल अधिकारी एस. पी. कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

आष्टीत विशेष शिबिरातून नागरिकांना विविध लाभाचे वितरण सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत कळंब तालुक्यातील आष्टी येथे १५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात मंडळ अधिकारी प्रमोद चचाणे, ग्राम महसूल अधिकारी संजय शेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान ग्रामपंचायत कार्यालय व इतर विभागांच्या माध्यमातून कृषी विषयक सेवा, महसुली सेवा, आरोग्य विषयक सेवा आणि ग्राम विकास विभागाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

नारकुंड येथील कोलाम समाजाच्या नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सेवा संकल्प अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) सेवा संकल्प अभियानातंर्गत १५ ऑक्टोबर रोजी यवतमाळ तालुक्यातील नारकुंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील, विशेषतः कोलाम प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देणे हा होता. या शिबिरात महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महत्त्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या. यामध्ये महिला शेतकरी नोंदणी, डिजिटल सातबारा चे वितरण, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचे दाखले यांसारख्या विविध महसूल सेवांचा समावेश होता. हे शिबिर पारपाडण्यासाठी मंडळ अधिकारी नितीन खरोडे आणि ग्राम महसूल अधिकारी अरविंद गुरनुले यांनी विशेष परिश्रम घेतले व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले

वडगाव येथे महसुलच्या विशेष शिबिरात २९२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

Image
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत पुसद तालुक्यातील वडगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनामार्फत विजाभज नागरिकांकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथे पार पडलेल्या या शिबिरात महसूल, आरोग्य, शिक्षण आणि पुरवठा विभागामार्फत ग्रामस्थांना विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांसह सर्व ग्रामस्थांसाठी करण्यात आले होते. शिबिरादरम्यान आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, सेतू सुविधा, पुरवठा विभागाच्या योजना, आरोग्य तपासणी आणि शिक्षण विभागाशी संबंधित विविध सेवा प्रत्यक्ष पुरवण्यात आल्या. या शिबिराचा सुमारे २९२ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला. हे शिबिर मंडळ अधिकारी एम.एस. शेळके आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही.एस. डोइफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2026 मतदानासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहिर

अमरावती/यवतमाळ दि. 16 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहिर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 22 सप्टेंबर, 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे‍ विभाग व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक - 2026 चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. निवडणूकीचे मतदान शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी मंगळवार दि. 27 ऑक्टोबर, 2026 रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना मतदानांचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135B नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून, 1991 रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या व्यक्तींना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाची प...