उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार ; सैनिक कल्याण विभागाचा उपक्रम
१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 10
(जिमाका): सैनिक कल्याण
विभागामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना
विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त
खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी
उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे,
संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात अगर इतर नैसर्गिक
आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी किंवा पाल्यांना अशा कार्याबद्दल
त्यांच्या सन्मानार्थ एक रकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत
दिला जाणार आहे.
तसेच सन २०२५-२०२६ मध्ये एस. एस. सी. बोर्डाच्या परिक्षेत ९०
टक्के व एच.एस.सी. बोर्डाच्या परिक्षेत ८५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण
होणाऱ्या माजी सैनिक किंवा विधवांच्या ५ पाल्यांना विभागीय पातळीवर १० हजार रुपये विशेष
गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी पात्र
असणाऱ्यांनी अर्ज कागदपत्रांसह १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
यवतमाळ येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र
माजी सैनिक किंवा विधवा यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयास
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment