अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळणार

 

महामंडळाची अनुदान व बिजभांडवल कर्ज योजना सुरु

अर्जासाठी ‘महादिशा पोर्टल

यवतमाळ, दि. १० (जिमाका) :  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, अमरावती मार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील पात्र अर्जदारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.

चालु आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत २०, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत २० असे एकूण ४० लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

या योजनांचे अर्ज महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra किंवा महादिशाच्या  https://mahadisha.mpbcdc या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध संवर्गातील स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. ए. अवघाते यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान