पारधी महिला बचत गटांना आर.ओ. व्यवसाय सुरु करण्याची संधी !
७ लाख ५१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार
2१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांच्यामार्फत सन २०२५-२६
पारधी विकास योजनेअंतर्गत पारधी समाजातील पात्र महिला बचत गटांना शुद्ध
पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आर.ओ. व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात
आली आहे. या योजनेंतर्गत पात्र पारधी महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
योजनेअंतर्गत एकूण ७ महिला बचत गटांची निवड करण्यात येणार असून, प्रति
गट ७ लाख ५१ हजार रुपये इतका योजनेचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. योजनेचे अर्ज एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांच्या https://itdp-pandharkawada.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करून देण्यात आले आहेत.
पात्र बचत गटांचे अर्ज दि. 2१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे स्वीकारले जाणार
आहेत.
योजनेसाठी पात्रता
:
योजनेसाठी महिला बचत गट हा पारधी अनुसूचित जमातीचा आणि प्रकल्प कार्यालयाच्या
कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक आहे. तसेच महिला बचत गटाकडे
नोंदणी प्रमाणपत्र, स्वतंत्र बँक खाते, गटाच्या बचतीची रक्कम आणि व्यवसायासाठीच्या
प्लॉटवर पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे.
कागदपत्र कोणती लागतात
:
अर्जासोबत गटातील सर्व सभादांचे जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड, बचत
गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, निवासी प्रमाणपत्र, राशनकार्ड, गटाचे बँक पासबुक,
सर्व सदस्यांचे सहमतीपत्र, यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याचे स्व-घोषणापत्र
तसेच व्यवसायाच्या जागेचा सातबारा उतारा किंवा भाडेतत्त्वावरील करारनामा आदी आवश्यक
कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२३५-२२७४३६ वर संपर्क साधावा. योजनेचे
अर्ज व अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. जिल्ह्यातील पारधी समाजातील पात्र महिला बचत गटांनी या योजनेचचा लाभ घ्यावा, असे आवाहन
प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment