उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या दि.१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समारंभात पालकमंत्री सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान