अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सूरु

यवतमाळ दि.३ :- राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता सूरु करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महाडीबीटी २.० पोर्टलद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या ऑनलाईनरित्या राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी काय करावे ? सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युजर आयडी, पासवर्डची आता गरज नाही, विद्यार्थ्यांनी आपला आधार वापरून नवीन महाआयडी बनवावा, आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती जसे पत्ता, मोबाईल, ईमेल आणि बँक अचूक व अद्यावत ठेवावी. आवश्यक सर्व कागदपत्रे जसे जातीचा दाखला, उत्पत्राचा दाखला.अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इत्यादी स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत. नवीन व नूतनीकरण अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी, आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थानी लॉगिन नंतर “माझा अर्ज नूतनीकरण करावा” ही विशिष्ट टॅब निवडावी. भारत सरकार मॅट्रीकोतर शिष्यवृत्ती योजनेतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्रहिस्सा विद्यार्थाच्या खात्यावर प्राप्त होताच संबंधित महाविद्यालयास शिक्षण शुल्काची रक्कम अदा करावी. महाविद्यालयांनी काय करावे महाविद्यालयासाठी आता केवल एकाच लॉगिन उपलब्ध असेल. जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपीक लॉगिन पूर्णपणे बंद), ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्ड बाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा. महाविद्यालयाने मागील युझर आयडी नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चित करण्यात आलेले शुल्क तत्काळ अद्यावत करावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्याची राहणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस, पोर्टलवरील लिंकवर लॉगिन या टॅबवर नागरिकांसाठी लॉगिन किंवा “महाआयडीशिवाय प्रवेश करा” या पर्यायाचा वापर करुन आधार बेस लॉगिन करणेसाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांक ओटीपी अद्यावत केल्यानंतर लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनेचा तपशील अद्यावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर पहा क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यांनंतर आपण निवड केलेल्या योजनेच्या समोर अप्लाय टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजनेसंबंधित आवश्यक कागदपत्र याप्रमाणे तपशील अद्यावत करून अर्ज ऑनलाईन सबमीट करावा व प्रिंट किंवा पीडीएफ मध्ये जतन करून ठेवावा. आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न इत्यादी पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी. महाविद्यालयासाठी सूचना महाडीबीटी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क परिक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. आपल्या महाविद्यालयाचे नांव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नांवे अभ्यासक्रमाचा कालावधी अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलवर मैप करणेसाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा उदा, संचालनालयास, विद्यापीठास, परिषदेस, एफआरए यांचेकडून मॅप करून घेण्याची कार्यवाही करावी. अधिक माहिती करिता ०२२-४९१५०८००, १८००१०२५३११ अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगीन मधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी दिली आहे. 000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित