आदिवासी विकास मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांची आश्रमशाळांना अचानक भेट
आश्रमशाळांची केली तपासणी
विद्यार्थ्यांसोबत साधला मनमोकळा संवाद
राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके यांनी काल (दि.१६) सायंकाळी तालुक्यातील कापरा आणि हिवरी येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देवून झडती घेतली. तसेच विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला.
शिक्षक
संख्येच्या प्रमाणात विद्यार्थी संख्या कमी असल्याने नाराजी व्यक्त करत शाळा प्रशासनावर
तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांना
दिले.
पहिली
ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेची मोठी इमारत, वसतिगृहाची सुविधा, १० शिक्षक असतांना
विद्यार्थी संख्या वाढणे अपेक्षित आहे. परंतू विद्यार्थी प्रवेश संख्या कमी आहे. तसेच
इयत्ता १० वी ते १२ वी साठी नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी असून विद्यार्थी संख्या
वाढविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी प्रयत्न केले नसल्याने नाराजी व्यक्त
करत त्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॅा. अशोक उईके यांनी
प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
यादरम्यान
मंत्री प्रा. डॅा. उईके यांनी शाळा परिसरासह मुलींचे वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह,
वैद्यकीय कक्षाची पाहणी करुन आवश्यक सूचना केल्या.
या
अचानक काढलेल्या दौऱ्यात आदिवासी विकास मंत्री डॅा. अशोक उईके यांनी हिवरी येथील शासकीय
माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देवून वसतिगृहाची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी
संवाद साधत शाळा, वसतिगृहातील सोईसुविधा, समस्या, अपेक्षा जाणून घेतल्या. यासोबतच त्यांनी
मुलामुलींच्या भविष्यातील ध्येयाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची
संख्या वाढविण्यासाठी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत चर्चा करावी त्यांना
विश्वासात घ्यावे. त्यासाठी पालकसभा आयोजित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.











Comments
Post a Comment